टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आरोग्य आणीबाणीतून पहिला धडा घेत भारताने आरोग्य क्षेत्रातील इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व करण्यासाठी भक्कम पाऊल उचललले आहे. कोरोनात नव्हे तर जीवघेण्या संसर्गजन्य आजारात रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक पीपीई किटच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने २० भारतीय कंपन्यांना बळ दिले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्याही तात्काळ देण्यात आल्या. वीस कंपन्यांच्या प्रयत्नांमुळे पीपीई किटसाठी चीन, सिंगापूर व दक्षिण कोरियावर असलेले भारताचे अवलंबित्व कमी होईल. कंपन्यांनी युद्धपातळीवर पीपीईची निर्मिती सुरू केली आहे.पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची (पीपीई) कमतरता देशात भासणार नाही. जिथे आवश्यक आहे तेथे तात्काळ पीपीई पोहोचवले जात आहेत. कोरोना रूग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई मिळतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली. १ कोटी ७० लाख पीपीई खरेदी करण्यात येतील. ४९ हजार वेंटीलेटर्सदेखील तयार ठेवण्यात आले असल्याची माहित आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाºयांनी दिली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, सरसकट प्रत्येकाला पीपीईची गरज नसते. त्याच्या वापराचे काही नियम आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ ते पाळत आहेत. कोरोनाच्या रुग्णात सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसतात. त्यापैकी गंभीर रुग्णावर उपचार करणाºयांना पीपीईची गरज असते.
‘पीपीई’ निर्मितीसाठी २0 कंपन्या तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:43 AM