शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

तीन राज्यांमध्ये 20 फ्लॅट, सोन्याच्या बिस्किटांसह मिळाली 98 लाखांची कॅश; अभियंत्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 4:21 PM

छापा टाण्यासाठी पोहोचलेले हे पथक सुरवातीला या अभियंत्याचे आलिशान घर पाहूनच थक्क झाले.

बिहारमध्ये एका अभियंत्याच्या घरात मोठं घबाड सापडलं आहे. एका विशेष पथकाने बुधवारी बिहार ब्रिज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता श्रीकांत शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. छापा टाण्यासाठी पोहोचलेले हे पथक सुरवातीला या अभियंत्याचे आलिशान घर पाहूनच थक्क झाले. यानंतर छापेमारी सुरू केली असता, अभियंत्याने घरात मोठे घबाड दडवून ठेवल्याचे समोर आले. या पथकाला अभियंत्याच्या घरात 97 लाख 80 हजार रुपांची कॅश सापडली. या नोटा ट्रॉली बॅगमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. याच बरोबर अभियंता साहेबांची तीन राज्यांतील 20 प्लाटची कागदपत्रेही आढळून आली. याशिवाय विमा गुंतवणुकीसह इतर गुंतवणुकीची कागदपत्रेही आढळून आली. या सर्वांची व्हॅल्यू एक कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे एकोण सत्तर रुपये असल्यचे सांगण्यात येत आहे. तसेच प्लॉट्स बिहारच्या वेगवेगळ्या शहरांसह झारखंडच्या देवघर आणि उत्तराखंडची राजधारी असलेल्या देहरादूनमध्येही आहेत. या अभियंत्याने 10 पॉलिसीजमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 18 बँकांचे पासबुक आहेत.

सोन्या-चांदीचे दागीने - याशिवाय, इंजिनिअरच्या घरातून सव्वा किलोहून अधिक सोनं आणइ तीन किलोहून अधिक चांदीही जप्त करण्यात आली आहे. सोन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं 580 ग्रॅम (किंमत जवळपास साडे 34 लाख रुपये) तसेच, 18 कॅरेटच्या सोन्याचे दागिने 700 ग्रॅमहून अधिक (किंमत जवळपास 32 लाख रुपेय). तसेच, 3.230 किलो चांदी, हिची किंमत जवळपास 13 लाख रुपये एवढी आहे. 

महत्वचे म्हणजे, अभियंता श्रीकांत शर्मा यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी 24 जुलै रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 26 जुलै रोजी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारCorruptionभ्रष्टाचार