ऑनलाइन लोकमतकेरळ, दि. 25 - सबरीमाला मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 20 जण जखमी झाल्याची माहिती पथनामथिट्टाचे जिल्हाधिकारी आर. गिरिजा यांनी दिली आहे. तर 4 जण अत्यवस्थ आहेत, असं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सबरीमालातल्या भगवान अयप्पाच्या डोंगरावरील मंदिरात ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते आहे. सबरीमालात आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सबरीमाला मंदिरातील काही मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले होते. मात्र भाविकांनी बॅरिकेड्सवरून उड्या मारून सबरीमाला मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 20 भाविक जखमी झाले आहेत.
20 #Sabarimala pilgrims injured in "minor stampede" at famous hill shrine of Lord Ayyappa, says Pathnamthitta Collector R Girija.— Press Trust of India (@PTI_News) 25 December 2016