गुवाहाटी - देशात मान्सूनचे आगमन होत असतानाच पूर्वोत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, यामध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दक्षिण आसामधील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील तीन वेगवेग आसाममधील तीन वेगवेगळ्या व्यक्तींचा समावेश आहे.
भूस्खलना्च्या या घटना दक्षिण आसाममधील बराक घाटी परिसरात घडल्या आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात हे भूस्खलन घडले आहे. या भूस्खलनामध्ये कछार जिल्ह्यातील सात, हेलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बचाव पथकाला घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे.