- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : लष्कराने पुंछ जिल्ह्यातील शाहिस्तार येथे आयएएफ वाहन हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करून माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त मोहिमेत शेकडो जवानांनी हल्ल्याच्या ठिकाणाला लागून २० किमीचा परिसर घेरला आहे.
दुडू बसंतगढमध्ये शेकडो जवान सलग ८ व्या दिवशीही गाव सुरक्षा समितीच्या सदस्याची हत्या करणाऱ्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा माग काढत आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातूनही जंगलावर लक्ष ठेवण्यात येत आहे. श्वानपथकांचाही या कारवाईत सहभाग आहे. सुरक्षा यंत्रणांनी १० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन, डीआयजी तेजेंदर सिंग, लष्कर आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
या हल्ल्यात तीन ते चार दहशतवादी सहभागी असावेत, असा सुरक्षा दलांना संशय आहे.
पाकचे माजी सैनिकच येत आहेत दहशतवादी बनूनएलओसीला लागून असलेले राजौरी आणि पूंछ हे जुळे जिल्हे सध्या लष्कर आणि इतर सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानने आपल्या माजी सैनिकांना दहशतवादी बनवून या जिल्ह्यांमध्ये पाठवणे सुरू केले आहे. या वर्षीही ही घुसखोरी कायम आहे. २०२३ मध्ये राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात डझनभर चकमकी झाल्या आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. गतवर्षी जिल्ह्यासाठी वर्षाची सुरुवात ढांगरी दहशतवादी हल्ल्याने झाली, त्यातील मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत. हा ट्रेंड २०२४ मध्येही कायम आहे.
स्टीलच्या गोळ्यांनी वाढविली चिंताnहल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांकडून स्टीलच्या गोळ्यांचा वापर भारतीय लष्करासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या आपल्या सैनिकांना सतत मागणी करूनही लेव्हल चार बुलेट प्रुफ जॅकेटही देण्यात आलेले नाही. nचिलखती वाहनांवर हल्ला करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या गोळ्यांमुळे सैनिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दहशतवाद्यांकडील स्टीलच्या गोळ्या जवानांचे बुलेट प्रूफ जॅकेट, बुलेट प्रूफ टोपी आणि बेल्ट भेदत आहेत.