उमविच्या २० फे र्या बंद
By admin | Published: December 09, 2015 11:59 PM
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फेर्या बंद करण्यातआल्या आहेत. मात्र फेर्या बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असल्याची ओरड काही विद्यार्थी संघटनांनी केेली आहे.
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फेर्या बंद करण्यातआल्या आहेत. मात्र फेर्या बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असल्याची ओरड काही विद्यार्थी संघटनांनी केेली आहे. महानगरपालिकेने सिटी बससेवा बंद केल्याने सहा सात महिन्या अगोदर जळगाव आगारातर्फे ३६ फेर्यांसहीत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र खाजगी रिक्षाचे भाडे बसच्या भाड्यापेक्षा कमी असल्याने विद्यार्थ्यांनी खाजगी वाहतुकीला प्राध्यान्य दिले. हळुहळु आगाराचे उत्पन्न घटू लागले. परिणामी दोन तीन महिन्यातच दहा फेर्या बंद क राव्या लागल्या. त्यानंतर अजून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने नाईलाजास्तव २० फेर्या कमी कराव्या लागल्या. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात बससेवेला विद्यार्थ्यांचाच प्रतिसाद कमी मिळत असल्याने सध्या पाच फेर्यांमिळून चार पाचशे रुपये उत्पन्न मिळत आहे. म्हणचे एका फेरीला फक्त शंभर रुपये. मात्र एका फेरीला डिझेल व कर्मचार्यांचा पगार असा एकू ण खर्च ३ हजारापर्यंत आहे. उत्पन्नपेक्षा खर्च जास्त असल्याने बसफे र्या बंद कराव्या लागल्या असे जुने बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम.एन.सोनवणे यांनी सांगितले. उत्पन्नाअभावी महानगरपालिकेनेही केली सिटी बससेवा बंद पाच वर्षापूर्वी महानगरपालिकेने आगाराकडून हस्तांतरित करून सिटी बससेवा सुरू केली. मात्र पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने कर्मचार्यांचा पगारदेखील निघत नव्हता. उत्पन्नाअभावी महानगरपालिकेनेही सिटी बससेवा बंद करून तीन वर्षातच पुन्हा रा.प. मंडळाकडे सोपविण्यात आली. पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रोज अपडाऊन शहरातील विविध भागातून रोज पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी अपडाऊन करीत असतात. पैकी अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पासेस् आहेत. बसफेर्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. याने खाजगी वाहतुकीला ऊत येऊन विद्यार्थ्यांना रिक्षा चालकांच्या मनमानी व दादागिरीला सामोरे जावे लागते, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. कोट- आजपासून प्रायोगिकतत्त्वावर पाच फेर्यात वाढ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता मंगळवारपासून विद्यापीठासाठी जादा पाच फेर्या वाढविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्यास फेर्या नियमित ठेवण्यात येतील. -एस.बी. खडसे, आगारप्रमुख, जळगावबसफेर्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. साहजिकच खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. मात्र यामुळे खाजगी रिक्षाचालकांची दादागिरी वाढत असून त्यांच्या मनमानीला सामोर जावे लागत आहे. फेर्या वाढविण्यात याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. -अमित पाटील, अभाविप, महानगरमंत्री