दिल्लीत पिझ्झा बॉयकडून कोरोनाचं संक्रमण झाल्याच्या प्रकारानंतर घरकाम करणाऱ्या महिलेकडूनही कोरोनाचं संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील पीतमपुरा भागातील एकाच घरात 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. विशेष म्हणजे 750 लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाची ही घटना गेल्या महिन्यात 24 मे रोजी येथे उघडकीस आली. त्यानंतर जर इथे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढल्यानं हा संपूर्ण परिसर ताबडतोब सील करण्यात आला. या भागातील एका घरात काम करणार्या महिलेमुळे हे संक्रमण पसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्या महिलेकडून प्रथम एक मुलगा आणि त्यानंतर घरातील इतर सदस्यांना संसर्ग झाला.राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. दररोज कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यानं परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. गुरुवारी कोरोना संसर्गाची 1369 नवीन प्रकरणे आल्यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. या नवीन घटनांमुळे राजधानीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 25000च्या वर गेली. आता या आजाराने संक्रमित रुग्णांची संख्या 25004 वर पोहोचली आहे. त्याच वेळी या विषाणूच्या संसर्गामुळे 650 लोक मृत्युमुखी पडले आहे. पीतमपुरामध्ये घरकाम करणाऱ्या बाईमुळे 20 जणांची कोरोना पॉझिटिव्ह झाले, तसेच 750 लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याच्या प्रकारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील पीतमपुरा येथील तरुणासह 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर 3 जून रोजी संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. जिल्ह्याच्या डीएमच्या म्हणण्यानुसार, कोरोना पॉझिटिव्हचे २० रुग्ण समोर आल्यानंतर या भागास सील करण्यात आले. तसेच उत्तर एमसीडीला परिसराची स्वच्छता करण्याचे काम देण्यात आले आहे.
हेही वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा
मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत
संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा