२०... सारांश
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM
वैभवनगरात भाजपची शाखा
वैभवनगरात भाजपची शाखा हिंगणा : वानाडोंगरी येथील वैभवनगर-हनुमानगरात भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आ. समीर मेघे, संध्या गोतमारे, संजू हुरपाटे, गोरक्षण पौनीकर, प्रशांत येवले, गजानन झाडे, विकास खंडारे, नंदकिशोर घडेकर, भीमराव वाघाडे, कैलास पराते, सौरभ कोहपरे, विवेक बारब्दे आदी उपस्थित होते. ***मौदा येथे सेवक संमेलनमौदा : स्थानिक मानवधर्म आश्रमात परमात्मा एक सेवक संमेलन पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, निशा सावरकर उपस्थित होते. या प्रसंगी ध्वजारोहण, पूजा यासह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले. ***सावंगी येथे कुपोषण जागृती अभियानकोदामेंढी : नजीकच्या सावंगी येथे कुपोषण जागृती व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ज्योती वरठी, मंगला देशमुख, लक्ष्मण परतेती, अर्जुन बावनकुळे, विठ्ठल महाकाळकर, नारायण हूड, वामन जुगनायके, मारोती बावनकुळे, देवचंद कुंभारे यांच्यासह स्थानिक नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.***मनसर येथे जनता दरबारमनसर : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आ. डी. एम. रेड्डी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यात मनसर, कांद्री, बोरडा, खुमारी, पटगोवारी, हिवराहिवरी, आजनी यासह अन्य गावांमधील ग्रामस्थांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासन रेड्डी यांनी दिले.***गतिरोधक तयार करण्याकडे दुर्लक्षतारसा : नजीकच्या तारसा ज्वॉईंट येथे मौदा-रामटेक, मौदा-कन्हान, रामटेक - कन्हान व मौदा-अरोली मार्ग येतात. या ठिकाणी खड्डे पडले असून, अपघात होत आहे. त्यामुळे येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. ***मोहखेडी - वांजरा रोडवर खड्डेमौदा : तालुक्यातील मोहखेडी-वांजरा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. हा मार्ग पावडदौना, मोहखेडी व वांजरा या गावांना जोडणारा असून, त्याची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.***