शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

मनपा आयुक्त कार्यालयात अडकल्या २०० फाईल्स

By admin | Published: February 10, 2015 12:56 AM

मनपा आयुक्त कार्यालयात अडकल्या २०० फाईल्स

मनपा आयुक्त कार्यालयात अडकल्या २०० फाईल्स
अर्थसंकल्पात कपातीचे संकेत : नगरेसवक, पदाधिकारी लावताहेत चकरा
नागपूर :
मार्च महिना संपेपर्यंत महानगरपालिका कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात गुंतली आहे. त्यामुळे सध्या झोन कार्यालय असो की मुख्यालय प्रत्येक ठिकाणी वसुलीचेच काम होताना दिसून येत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात कपात केली जाणार असल्याची शक्यता दिसून येत असतानाच, आयुक्त कार्यालयात तब्बल २०० फाईल्स अडकून असल्याची माहिती पुढे आली आहे. अडकलेल्या फाईल्स मंजूर करण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
२०१५-१६ या वर्षासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे, तर २० फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समितीची बैठक होणार आहे. आयुक्त आपला अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सादर करतात. त्यामुळे २० फेब्रुवारी रोजी आयुक्तांचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प १२०० ते १३०० कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात स्थायी समितीने सादर केलेल्या १६४५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात कपात होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या विभागांसाठी ठेवलेल्या निधीतून संबंधित विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. परंतु आयुक्त बैठक घेऊन वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत आहेत. तसेच महापालिकेची तिजोरी खाली असल्यानेसुद्धा फाईल्स स्वाक्षरीसाठी पडून आहेत.
नगरसेवक आपापल्या प्रभागाच्या फंडाशी जुळलेल्या फाईल्स क्लिअर करण्यासाठी स्थायी समिती कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. अडकलेल्या फाईल्स क्लिअर होत नसल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनीसुद्धा इतर फाईल्स स्वाक्षरीसाठी अडवून ठेवल्या आहेत. अशा परिस्थितीत स्थायी समिती कार्यालय परिसरात अनेक नगरसेवक चकरा मारीत फिरत आहेत.

बॉक्स..

अधिकाधिक फाईल्स मंजूूर करण्याचा प्रयत्न

अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार अधिकाधिक फाईल्स मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुक्त नवीन आहेत. त्यांना फाईल समजायला वेळ लागत आहे. त्यामुळे थोडा उशीर होत आहे. तरीही फाईल मंजूर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी स्पष्ट केले.