नवी दिल्ली : दिल्लीत या हिवाळ््यातील सगळ््यात दाट व वाईट धुक्याने दृश्यमानता ५० मीटरपर्यंत खाली आणल्यामुळे येथीलइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या व येथून उड्डाण होणा-या २०० विमानांना रविवारी विलंब झाला किंवा ती रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. १५० विमानांना विलंब झाला तर जवळपास ५० विमानांचे मार्ग बदलावे लागले व अंदाजे २० उड्डाणे रद्द करावी लागली.येथील विमानतळावरून उड्डाणासाठी दृश्यमानता किमान १२५ मीटर्सची आवश्यक असते. कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्यासाठी या विमानतळावर सीएटी आयआयआयबी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. २५-५० मीटर दृश्यमानतेमध्ये येथे विमान उतरवले जाऊ शकते.तथापि, ५० विमानांना जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आले कारण विमान कंपन्यांनी नियुक्त केलेले पायलटस हे सीएटी आयआयआयबी तंत्रज्ञानाशी परिचित नव्हते. सकाळी साडेपाचपासून धावपट्टीवरील दृश्यमानता ५० ते ७५ मीटरदरम्यानची होती.
दिल्लीत दाट धुक्याने २०० उड्डाणांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 2:43 AM