नवी दिल्ली: जी नोट हातात येताच चेहऱ्यावर आनंद येतो, ती 2 हजाराची नोट अचानक बाजारातून गायब झाली आहे. कदाचित तुमच्याही ते लक्षात आले असेलच. पण, ही दोन हजाराची नोट बाजारातून गायब होण्यामागचे कारण काय आहे? 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात 2 हजाराची नवी नोट छापण्यात आलेली नाही, अशी माहिती सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.
2000च्या नोटा कमी झाल्याआरबीआयच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये एक लाख रुपयांच्या नोटांमध्ये 2 हजाराच्या नोटांची संख्या 32910 रुपये होती. हे मार्च 2021 पर्यंत 24510 रुपयांपर्यंत कमी झाली. 30 लाख कोटी रुपयांच्या एकूण चलनात 2 हजाराच्या नोटांचे मूल्य 2019 मध्ये 6 लाख 58 हजार कोटी होते. एका वर्षानंतर 2020 मध्ये ते 4 लाख 90 हजार कोटींवर आले.
500 रुपयांच्या नोटांचे चलन वाढले31 मार्च 2021 पर्यंत देशात चलनात असलेल्या एकूण पैशांमध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या 85 टक्के नोटा होत्या. उर्वरित नोटा 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या होत्या. 31 मार्च 2020 रोजी हा आकडा 83 टक्के होता. यावरूनच चलनात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 2000 च्या नोटांच्या छोट्या व्यवहारात अडचण येत आहे. यावरून 2000 च्या तुलनेत 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे चलन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
एटीएममधून 2000 च्या नोटांचे बॉक्स काढलेलोकांना छोट्या व्यवहारात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एटीएम आणि बँकेतून फक्त 500 रुपयांच्या नोटाच जास्त मिळत आहेत. हळूहळू एटीएममध्येही 2000 च्या नोट बॉक्सऐवजी 500 च्या नोटांचा बॉक्स ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर एटीएममध्ये नोटा टाकणाऱ्या कंपन्यांना 2 हजाराच्या नोटा कमी दिल्या जात आहेत.