शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उद्यापासून २००० ची नोट बँकेत जमा करता येणार; काय करायचे - काय नाही, RBI गव्हर्नरनी स्पष्ट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:57 PM

बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे

नवी दिल्ली - आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर आता २३ मे पासून म्हणजे उद्यापासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २००० नोटा बदलण्यावरून लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले आहे. लोकांकडे ४ महिन्यांचा कालावधी नोटा बदलण्यासाठी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजाराची नोट पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. सध्या बाजारात असलेल्या २ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकिंग सिस्टममध्ये येण्याची शक्यता आहे. करन्सी मॅनेटमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. २ हजाराच्या नोटा लीगल टेंडर राहतील असंही आरबीआयने म्हटलं आहे. 

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, ज्यांच्याकडे २००० रुपयांची नोट आहे तो ती त्याच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा इतर कोणत्याही मूल्याच्या चलनात बदलू शकतो. बँकांना २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत २००० रुपयांच्या बहुतांश नोटा परत मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. “सिस्टीममध्ये आधीच पुरेशी रोकड आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडेच नाही तर बँका चालवल्या जाणाऱ्या करन्सी चेस्टमध्येही पुरेशी रोकड आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. रिझर्व्ह बँक लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केंद्रीय बँक गरज पडल्यास नियमन आणेल असा दिलासाही आरबीआयने दिला. 

२००० रुपयांची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम होईल. कारण एकूण चलन चलनात त्याचा वाटा फक्त १०.८ टक्के आहे. २०१६ च्या नोटाबंदीनंतर काढलेल्या चलनाची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांची नोट सादर करण्यात आली होती. आमच्याकडे पुरेशा नोटा आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सध्याच्या नियमांनुसार, ५०००० रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅन द्यावा लागतो. २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याच्या प्रक्रियेतही ही व्यवस्था सुरूच राहणार असल्याचे दास यांनी सांगितले.

शक्तिकांत दास यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे२००० रुपयांची नोट बदलताना गोंधळून जाऊ नका२००० च्या नोटा आणण्याचा उद्देश पूर्ण झालाबँका २००० रुपयांच्या नोटांची संपूर्ण माहिती ठेवतीलनोटा बदलण्यासाठी ४ महिनेसध्याच्या नियमांनुसारच नोटा जमा केल्या जातील२००० च्या नोटांची छपाई थांबली आहे.५०००० हजारांपेक्षा जास्त ठेवींवर माहिती द्यावी लागेल. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक