ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं 2 हजारांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या. त्यानंतर या दोन हजारांच्या बनावट नोटाही भारत-बांगलादेश सीमेवरून जप्त करण्यात आल्या होत्या. आता दोन हजारांच्या नोटा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या नाहीत, असं वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. 2 हजारांच्या नव्या नोटांमुळे भ्रष्टाचाराला आमंत्रण मिळेल. या नोटेचा अवैध देवाण-घेवाणीत सर्रास वापर केला जाईल, असंही ते म्हणाले आहेत. भोपाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2 हजारांच्या नोटेमुळे लाच देणा-या आणि घेणा-यांचाही फायदा होऊ शकतो.रामदेव बाबा हे कायम मोदी सरकारसारखीच काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका घेत होते. मात्र नोटाबंदीनंतर रामदेव बाबा काहीसे शांत होते. अखेर रामदेव बाबांनी दोन हजारांच्या नोटांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
2000च्या नोटा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या नाहीत- बाबा रामदेव
By admin | Published: February 20, 2017 5:54 PM