लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेतील २३३ पैकी २२५ खासदारांची संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे यांचा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), नॅशनल इलेक्शन वॉच या दोन संस्थांनी संयुक्त अभ्यास केला. या २२५ खासदारांपैकी ७५ जणांनी म्हणजे ३३ टक्के खासदारांनी त्यांच्यावर नोंदलेल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती जाहीर केली तसेच २२५ खासदारांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य १९,६०२ कोटी रुपये आहे.
राज्यसभेतील विद्यमान खासदारांपैकी ४० जणांनी म्हणजे १८ टक्के लोकांनी आपल्यावरील गंभीर फौजदारी गुन्ह्यांची माहिती जाहीर केली आहे. त्यातील दोघांवर हत्या केल्याचा तर चारजणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्यसभेतील एकूण खासदारांपैकी २२५ जणांच्या संपत्तीच्या माहितीचे विश्लेषण केले असता ३१ खासदार (१४ टक्के) अब्जाधीश असल्याचे आढळले. दोन सदस्यांवर कलम ३०२ आणि ४ सदस्यांवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला आहे.
सर्वाधिक संपत्ती कुणाकडे? भाजपच्या ९० खासदारांकडे ३३६० कोटी रुपये संपत्ती आहे. तर प्रत्येक खासदाराकडे सरासरी संपत्ती ३७.३४ कोटी रुपये आहे. काँग्रेसच्या २८ खासदारांकडे ११३९ कोटी रुपयांची संपत्ती असून, प्रत्येक खासदाराकडे सरासरी संपत्ती ४०.७० कोटी रुपये आहे.वायएसआरसीपीच्या ११ खासदारांकडे ३९३४ कोटी असून, सरासरी संपत्ती ३५७.६८ कोटी रुपये आहे.
n३७ (१६%) खासदार हे ५ ती १२ वी पास असलेले आहेत.n१८२ खासदार पदवी घेतलेले आहेत.n११ खासदार ३१ ते ४० वर्षे वयोगटातील आहेत.n११५ खासदार ४१ ते ६० वयोगटातील n९६ खासदार ६१ ते ८० वर्ष वयोगटातील आहेत.n३ खासदार ८० वर्ष पूर्ण केलेले आहेत.n२२५ राज्यसभा सदस्यांपैकी ३६ (१६%) महिला खासदार आहेत.
कमी पैसेवाले खासदार कोणते? संत बालबीर सिंग आप - ३ लाखमहाराजा सनाजोबा लेईशेमबा भाजप - ५ लाखप्रकाश बाराईक तृणमूल काँग्रेस - ९ लाख