अहमदाबाद : गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी कोर्टाने पाचपैकी दोन आरोपींना दोषी ठरविले आहे. तर बाकीच्या तिघांची सुटका करण्यात आली आहे.
गोध्रा हत्याकांडप्रकरणी आज एसआयटी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आरोपी इमरान उर्फ शेरु भटुक आणि फारुख भाना यांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. तर, हुस्सैन सुलेमान मोहन, फारुक धांतिया आणि कासम भमेडी यांची सुटका केली आहे.
दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनवर कारसेवक असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 डब्याला आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात 59 प्रवासी होते.