जयपूर - जयपूरमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जयपूरमधील न्यायालयाने चार दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणी आहे. २००८ मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जयपूरमधील विशेष या प्रकरणी चार आरोपींना दोषी ठरवले होते. तर एका आरोपीची मुक्तता केली होती. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते. २००८ मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने आज दोषी आरोपींना शिक्षा सुनावली. यामध्ये सरवर आझमी, मोहम्मह सैफ, सैफुर रहमान आणि सलमान या चार आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 5:02 PM