शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

२०२ उमेदवार कोट्यधीश

By admin | Published: May 13, 2016 4:24 AM

केरळ विधानसभेसाठी सोमवार दि. १६ मे रोजी निवडणूक होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी २०२ उमेदवार कोट्यधीश असून

नवी दिल्ली : केरळ विधानसभेसाठी सोमवार दि. १६ मे रोजी निवडणूक होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी २०२ उमेदवार कोट्यधीश असून, ३११ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर)तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. केरळ विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात ११२५ उमेदवार आहेत. कोट्यधीश उमेदवारांत काँग्रेसचे ४३, माकपाचे २४, भाजपाचे १८, भारत धर्म जनसेनेचे १८, अण्णा द्रमुकचे २, आययूएमएलचे १७, केरळ काँग्रेसचे (एम) ९ आणि ३० अपक्ष यांचा समावेश आहे. दाखल केलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकूणच उमेदवारांची सरासरी संपत्ती १.२८ कोटी रुपयांची आहे.रिंगणातील ११२५ उमेदवारांपैकी ३११ जणांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे नोंदले गेल्याचे स्वत:च जाहीर केले आहे. त्यात माकपाचे ७२, भाजपाचे ४२, इंडियन नॅशनल काँग्रेसचे ३७१, भारत धर्म जनसनेचे १३, माकपचे १५, आययूएमएलचे ६, एसडीपीआयचे २५ आणि ४३ अपक्ष असे वर्गीकरण आहे.> केरळ-सोमालिया तुलनेमुळे संतापतिरूअनंतपुरम : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात केरळची तुलना सोमालियाशी केल्याबद्दल आणि संबंधित वक्तव्य मागे न घेतल्याबद्दल मुख्यमंत्री ओमन चांडी आणि माकपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.मोदींनी केरळमधीलच नव्हे, तर जगातील मल्याळी समुदायाचा अवमान केला आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेऊन आपली ‘राजकीय शालीनता’ दाखवावी. ही तुलना ‘आधारहिन आणि वस्तुस्थिती’च्या विरुद्ध आहे. चांडी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मोदी यांनी मौन स्वीकारले असून, केरळच्या जनतेला त्यांचे मौन नव्हे, तर बिनशर्त माफी पाहिजे. मोदी यांनी निवडणूक सभेत राज्यातील आदिवासींच्या बालमृत्युदराची तुलना आफ्रिकेतील सोमालिया या देशाशी केली होती. >१0४ महिला रिंगणात११२५ पैकी ४९६ उमेदवारांनी ‘पॅन’चा तपशील दिलेला नाही. तर ८३४ जणांनी त्यांचा प्राप्तीकराचा तपशील जाहीर केलेला नाही. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता ६६९ उमेदवार पाचवी ते १२ उत्तीर्ण आहेत. ३८० जणांनी पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतले आहे. २९ जण केवळ साक्षर आहेत. ७ जण निरक्षर आहेत. या सर्वांनी शपथपत्रातच ही माहिती दिली आहे. ६ उमेदवार ८० पेक्षा जास्त वयाचे असून दोघांनी त्यांचे वय जाहीर केलेले नाही. या वेळी १०४ महिला उमेदवार त्यांचे भवितव्य अजमावत आहेत.> माकपचे टीकास्त्र : मोदी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर माकपनेही हल्लाबोल केला आहे. माकपचे महासचिव कोडियारी बाळकृष्ण म्हणाले की, राज्याची स्थिती सोमालियातील स्थितीशी होऊ शकत नाही. मोदींच्या वक्तव्याने राज्यातील जनतेचा अपमान झाला असून, निवडणुकीत जनता भाजपाला झटका दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यात सोमालियासारखी स्थिती नाही, हे पंतप्रधानांनी समजून घेतले पाहिजे. ज्या राज्यात मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रचार केला, तिथे भाजपाचा पराभव झालेला आहे.