शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार - पंतप्रधान मोदी

By admin | Published: May 26, 2017 5:19 PM

आसाममध्ये लोहीत नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया पूलाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण झाले.

 ऑनलाइन लोकमत

दिसपूर, दि. 26-  आसाममध्ये लोहीत नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया पूलाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण झाले. आसाम आणि अरुणाचल या दोन राज्यांना जोडणारा हा पूल आर्थिक क्रांती घडवेल आणि महासत्ता बनण्यामध्ये देशाला उपयोगी ठरेल असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. आसाम आणि अरुणाचलच्या जनतेला हा पूल एकत्र आणेल असे मोदी म्हणाले. 
 
प्रसिद्ध गायक भूपेन हजारीका यांचे नाव पूलाला देण्याची घोषणा मोदींनी केली. सरकारच्या तिस-यावर्षपूर्तीच्या निमित्ताने मोदी यांनी देशातील या सर्वात मोठया पूलाचे लोकार्पण केले. या पूलामुळे शेतक-यांना लाभ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आपल्या सरकारचे लक्ष्य असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. 
 
विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्याचे मोदींनी सांगितले. आसाममधल्या ढोला आणि अरुणाचलमधल्या सदिया यांना जोडणारा हा पूल पूर्वोत्तर राज्यांसाठी दळणवळण क्रांती ठरणार असल्याचं सांगितलं जातं आहे. सध्या या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 6 तासांचा प्रवास करावा लागतो तो आता फक्त 1 तासावर येणार आहे. 
 
शिवाय 165 किमीचं अंतरही वाचणार आहे. ज्यामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे. चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे. 
 
या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी तुकडीला आसामच्या ढोलामधून अरुणाचलला जायचं असलं की नौकेतून प्रवास करण्यासाठी तासनतास घालवावे लागत. सोबत अवजड वाहन असल्यास 250 किमी वळसा घालत 10 तासांचा प्रवास करावा लागायचा. पण या पूलामुळे पूर्वोत्तर सीमेवर लष्कराला अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे. 
 
पुलाची वैशिष्ट्यं
- ढोला-सदिया ब्रम्हपुत्र पुलाची लांबी 9.15 किलोमीटर आहे.
- ब्रम्हपुत्र पुल वांद्रे-वरळी सी-लिंकपेक्षा 30 टक्के मोठा आहे.
- आसामची राजधानी दिसपुरपासून 540 किमी आणि अरूणाचलची राजधानी ईटानगरपासून 300 किमी लांब आहे.
- महत्त्वाचं म्हणजे चीनचं एरियल डिस्टंस 100 किमीपेक्षा कमी आहे.
- तेजपुर जवळ असलेल्या कलाईभोमोरा पुल नंतर ब्रम्हपुत्रवर पुढच्या 375 किमी ढोलापर्यंत दूसरा पुल नाही आहे.
- आत्तापर्यंत नदीच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत होता. 
- ब्रम्हपुत्र पुल बनवायचं काम 2011मध्ये सुरू झालं होतं, तर पुलासाठी एकुण 950 करोड खर्च झाला आहे.
- एकुण 182 खाबांवर हा पुल उभा आहे.
- आसाम आणि अरूणाचल या दोन राज्यांना हा पूल जोडेल.
- लोकांना प्रवास करण्यासाठी तसंच लष्कराला या पुलाचा खूप फायदा होणार आहे.
- चीन सीमेपर्यंत प्रवास करण्यासाठी चार तासांचं अंतर कमी होणार आहे.