'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 04:07 PM2023-11-21T16:07:12+5:302023-11-21T16:12:23+5:30

2023 Uttarakhand Tunnel Collapse: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

2023 Uttarakhand Tunnel Collapse: "All 41 people will return safely, no one will get even a minor injury", the international expert expressed his belief | 'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामगारांची सुटका होण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बोगदेविषयक तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी साइटवर अजून काही तांत्रिक मुद्दे आहेत, मात्र कामगारांना वाचवलं जात नाही तोपर्यंत ते कायम राहणार आहेत, असं सांगितलं आहे.  मात्र सर्व ४१ जण घरी पोहोचतील, तसेच कुणालाही साधी दुखापतही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

डिस्क यांनी सांगितले की, अमेरिकन ऑगर मशीन सध्या काम करत नाही आहे. मात्र ती सज्ज आहे. ऑगरिंगसाठी खूप अचूक इंजिनियरिंगची आवश्यकता असते. कारण आपण जर काही चुकीचं केलं तरके भूस्खलनाचं कारण बनू शकतं.

त्यांनी पुढे सांगितले की, मला वाटते ९०० पाईप वापरून पाईपलाइन टाकणे हा उपलब्ध पर्यायांमधील एक पर्याय आहे. तो मी पाहिलाय. आता त्यावर पुन्हा नजर टाकण्यासाठी मी जात आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीचं हे एक चांगलं आणि वेगवान साधन आहे. मात्र यामध्ये काही तांत्रिक अडथळे आहेत, त्यामुळेच आम्ही अनेक बचाव अभियानं चालवत आहोत.

आम्ही व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी दोन ठिकाणांची निश्चिती केली आहे. दोन्ही अधिक उंचीवर आणि बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या टोकाला आहेत. आम्ही अनेक मोहिमा आणि प्लॅनसोबत काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सर्व ४१ कामगारांना सुखरूपपणे वाचवलं जाईल, मी इथे आलो तेव्हा सांगितलं की, सर्व ४१ जण घरी पोहोचतील, तसेच कुणालाही साधी दुखापतही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: 2023 Uttarakhand Tunnel Collapse: "All 41 people will return safely, no one will get even a minor injury", the international expert expressed his belief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.