“२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील, धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:20 PM2023-02-13T23:20:49+5:302023-02-13T23:21:20+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ दिग्विजय सिंह यांचा आरोप. सर्जिकल स्ट्राईक, अदानी प्रकरण, भारत जोडोवरही केलं वक्तव्य.

2024 elections will see surprising results cheating people by government in the name of religion congress senior leader digvijay singh | “२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील, धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक”

“२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील, धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक”

googlenewsNext

२०२४ मध्ये आश्चर्यचकित करणारे निकाल दिसतील. तसंच धर्माच्या नावाखाली सरकारकडून लोकांची फसवणूक होत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचं कधी कौतुक तर करणार नाहीत. पण देशात काय होत आहे हे त्यांनी पाहावं. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब आणखी गरीब. सोबतच बेरोजगारी वाढत आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींना दिसत नाही. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांची कविता वाचली, त्यांचंच भोपाळमधील वडिलोपार्जित घर जमिनदोस्त करण्यात आलं,”असं त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. 

बोलताना दिग्विजय सिंह यांनी अदानी मुद्द्यावरही भाष्य केलं. “हर्षद मेहता केसमध्ये आमच्या सरकारनं जेपीसीचा तपास केला. आता अदानी देशाला लुटत आहेत. एक रिपोर्ट आलाय की अदानी समूहाने कसा भ्रष्टाचार केला. परंतु पंतप्रधान मोदी काहीही बोलत नाहीत. सरकार या प्रकरणी जेपीसीचा तपास का करत नाहीत?” असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. टीव्ही ९ भारतवर्षशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना काँग्रेस सरकारच्या काळात रॉबर्ड वाड्रा यांच्या संपत्तीत वाढ झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर असं असेल तर सरकारनं याचा तपास करावा, असंही ते म्हणाले. 

"३५ए मुळे काश्मिरींना फायदा"
“काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन सर्वच आहेत. ३५ए मुळे काश्मिरी जनतेला फायदा होता. जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा जम्मूच्या हिंदूंनी बाहेरचे लोक आमच्या जमिनी खरेदी करत असल्याचं म्हटलं. आमचा व्यवसाय संपला आहे. आम्ही कलम ३७० वर बोलणार नाही कारण आता तो मुद्दा संपलाय. काश्मिरीयत अबाधित राहावी याची आम्हाला चिंता आहे,” असं त्यांनी नमूद केलं. 

"हिंदू धर्माचं हिंदुत्वाशी घेणंदेणं नाही"
“सावरकरांनी हिंदुत्व या शब्दाचा शोध लावला. हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. या देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहत आहेत. दोघांनी मिळून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आरएसएसने माझ्यावर मानहानीचा दावा केला आहे. मी खरा देशभक्त आहे,” असं दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

"मतांसाठी भारत जोडो यात्रा नाही"
देशाच्या परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात. देशात भीतीचे वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी आम्ही देश जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली. देशात महागाई आणि बेरोजगारी आहे. आम्ही मतांसाठी नव्हे तर भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्जिकल स्ट्राईकवरही वक्तव्य
“सर्जिकल स्ट्राईकवर मी जे काही बोललो, त्यावर माझ्या पक्षांतर्गत आक्षेप असू शकतात, पण मला त्यात काही अडचण नाही. मी मुख्यमंत्री असताना नोकरीत आरक्षण दिले. पुलवामा हा दहशतवाद्यांनी प्रभावित क्षेत्र आहे. तेथे राहुल गांधी यांनी पुष्प अर्पण केले. पुलवामामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश होते. पण कोणावरही कारवाई झाली नाही. माझे प्रश्न या विषयावर होते,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: 2024 elections will see surprising results cheating people by government in the name of religion congress senior leader digvijay singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.