शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 5:33 PM

या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये  कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात देण्यासाठी बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यात काँग्रेससह (Congress) 15 पक्ष सहभागी झाले होते. मात्र, बैठकीनंतर जे काही दृष्य समोर आले, त्याने विरोधकांच्या ऐक्याचे सत्य समोर आणले आहे. या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये  कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या बैठकीनंतर, विरोधकांची संयुक्त पत्रकारपरिषदही पार पडली. मात्र यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहभागी झाले नव्हते. आम आदमी पक्षाने म्हटले आहे, केद्र सरकारने दिल्लीसंदर्भात आणलेल्या अध्यादेशावर जोवर साथ मिळणार नाही, तोवर पुढील बैठकीत सहभागी होणार नाही.

खरे तर, विरोधकांच्या ऐक्याला बळकटी येण्यापूर्वीच तडे जाताना दिसत आहेत. कारण या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केजरीवाल सहभागी झाले नाही आणि आम आदमी पक्षाने एक स्टेटमेंट जारी करत, जोवर अध्यादेशासंदर्भात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोवर आम्ही पुढील रणनीतीत सहभागी होणार नाही, असे म्हटले आहे.

भाजपचा सवाल - विरोधकांच्या या बैठकिवर भाजपनेही निशाणा साधला आहे. आगामी काळात विरोधकांचे हे ऐक्य तर दिसणार नाहीच, पण त्यांची आघाडीही दिसणार नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. यातच, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये नीतीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये टाकल्याचा उल्लेख करत, त्यांच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाआघाडीची धुरा कुणाकडे असणार? -याच बरोबर, या महाआघाडीची धुरा कुणाकडे असणार? असा सवालही भाजपने केला आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, वरातीचा नवरदेव कोण आहे? जर आपण 2024 मध्ये आला आहात तर आपला नवरदेव कोण? हे तर सांगा. एवढेच नाही, तर भाजपने या बैठकीला भ्रष्टाचाऱ्यांची बैठक म्हटले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा