- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान शहरी आवास योजनेखाली ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे, अमरावती यांसह ३४ शहरांमध्ये, ७९ प्रकल्पांद्वारे १ लाख ४0 हजार ५१९ घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २,0९६ कोटी १ लाख रुपयांचे केंद्रीय साह्य मंजूर केले आहे. वरील ५ शहरांमध्येच सर्वाधिक घरे बांधण्यात येणार आहेत.मात्र, राज्यात या योजनेखाली किती घरे बांधण्याची गरज आहे, ही माहिती केंद्राने महाराष्ट्र सरकारकडून मागविली असून, वरील सर्व योजना मान्य केल्या आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याने ही माहिती देताना सांगितले की, शहरी गरिबांच्या घरांच्या मागणीनुसार हे साह्य दिले जाते. त्यात प्रत्येक राज्याचा वा केंद्रशासित प्रदेशाचा कोटा ठरविण्यात आलेला नाही. राज्यसभेत राजकुमार धूत (शिवसेना) यांनी राज्याचा घरांसाठीचा कोटा वाढविणार का, असे विचारले होते. त्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप पुरी म्हणाले की, घरांची गरज हा या योजनेचा निकष असून, त्यात राज्याच्या कोट्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे व अमरावती या शहरांतील गरिबांची घरांसाठीची मागणी अधिक असल्याने, तिथे अधिक सदनिका बांधण्यात येतील.जिल्हावार घरेनगर1496अमरावती8532औरंगाबाद1760बुलडाणा833चंद्रपूर264धुळे858गडचिरोली1264जालना364कोल्हापूर565लातूर1632नागपूर8447नंदूरबार176नाशिक626पालघर8611परभणी500पुणे7494रायगड5981सांगली130सातारा112सोलापूर34377ठाणे55055वाशिम386वर्धा834
गरिबांच्या घरांकरिता राज्याला २,0९६ कोटी; ठाणे, सोलापुरात सर्वाधिक घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:47 AM