नवी दिल्ली : ईडीच्या विनंतीवरून केंद्राने महादेव ॲप आणि रेड्डी अण्णा प्रेस्टोप्रोसह २२ बेकायदा सट्टेबाजी प्लॅटफॉर्म बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आरोप केला की, छत्तीसगड सरकारने तसे करण्याचे अधिकार असूनही हे प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याची कोणतीही विनंती पाठवली नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव ॲप आणि रेड्डी अण्णा प्रेस्टोप्रोसह २२ बेकायदा बेटिंग ॲप आणि वेबसाइटविरुद्ध ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ईडीकडून विनंतीनंतर छत्तीसगडची कारवाईईडीने ॲपच्या बेकायदा ऑपरेशन्सचा खुलासा केल्यानंतर ही कारवाई केली आहे. छत्तीसगड सरकारला कलम ६९अ/ आयटी कायद्यानुसार वेबसाइट, ॲप बंद करण्याची शिफारस करण्याचे सर्व अधिकार होते. तथापि, त्यांनी तसे केले नाही. ईडीकडून पहिली विनंती प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, असे चंद्रशेखर म्हणाले.