शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

२१ सरकारी बँका तोट्यात

By admin | Published: June 03, 2017 12:42 AM

भारताच्या आर्थिक समृद्धीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली प्रचंड आशावादी असले तरी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या २७पैकी

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या आर्थिक समृद्धीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली प्रचंड आशावादी असले तरी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या २७पैकी २१ सार्वजनिक बँका आज तोट्यात आहेत. बँकांच्या सातत्याने वाढत असलेल्या नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेटस (एनपीए)मुळे नवेच आर्थिक संकट उभे राहिले आहे. देशातील काही प्रमुख बँका बहुतांश कर्जे बुडण्याच्या गंभीर संकटाला तोंड देत आहेत. उदाहरणेच द्यायची तर इंडियन ओव्हरसीज बँकेचा एनपीए ३५,0९८.२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेने वाटलेल्या एकूण कर्जाच्या २२.३९ टक्के ही रक्कम आहे. याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचा एनपीए ४४,७५२.५९ कोटी (कर्जवाटपाच्या २१.२५ टक्के) पंजाब नॅशनल बँकेचा एनपीए ५५,३७0.४५ कोटी (एकूण कर्जवाटपाच्या १२.५३ टक्के) देना बँकेचा एनपीए १२,६१८.७३ कोटी रुपये (कर्जवाटपाच्या १६.२७ टक्के) आणि कॅनरा बँकेचा एनपीए ३४२0२.0४ कोटी रुपये (कर्जवाटपाच्या ९.६३ टक्के) आहे. सार्वजनिक बँकांच्या एनपीएमधील बहुतांश कर्ज हे मोठ्या उद्योगसमूहांकडे थकलेले कर्ज असून, यापैकी काहींचे कर्ज बुडीत कर्ज म्हणून घोषित करण्यात आले आहे.बँकांच्या कॅपिटल टू रिस्क रेशोने (प्रमाण) ७.७५ टक्क्यांच्या खालची पातळी गाठली तर रिझर्व बँकेतर्फे त्वरित दुरुस्ती कारवाई (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन)चा निर्णय घेतला जातो. हे प्रमाण ३.६५ टक्क्यांच्याही खाली गेला तर सदर बँक एकतर बंद करण्याचा अथवा अन्य बँकेत तिचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. तूर्त आयडीबीआय व युनायटेड कमर्शिअल (युको) बँक अशा दोन बँकांबाबत प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शनचा निर्णय रिझर्व बँकेने घेतल्याचे समजते. याखेरीज भांडवली बाजाराच्या जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, देना बँक, युनायटेड बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक अशा आणखी ७ बँकांबाबतही रिझर्व बँक लवकरच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शनचा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती मिळाली आहे.केंद्र सरकारला बँकाकडून मिळणाऱ्या लाभांशाच्या उत्पन्नातही गेल्या तीन वर्षांत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार २0१३-१४च्या आर्थिक वर्षात सार्वजनिक बँकांकडून सरकारला ४२८३ कोटी रुपयांचा तर २0१४-१५च्या आर्थिक वर्षात ४३५६ कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता. पण २0१५-१६ साली सरकारला बँकांकडून मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम १४४५ कोटी रुपये म्हणजे वर्षभरात एकतृतीयांशपर्यंत खाली आली आहे. सन २0१५-१६ साली २७ सार्वजनिक बँकांपैकी फक्त ६ बँकांनीच सरकारला लाभांश दिला. बाकीच्या २१ बँका कोणताही लाभांश सरकारला देऊ शकलेल्या नाहीत.गरीब कल्याण योजनेला थंड प्रतिसादसक्तवसुली संचालनालयाचे देशात ठिकठिकाणी बेनामी व्यवहारांबाबत धाडसत्र सुरू असले तरी बेहिशेबी रकमेवर ५0 टक्के कर भरून उर्वरित ५0 टक्के रकमेचे पांढऱ्या पैशात रूपांतर करणाऱ्या ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’ला अपेक्षेपेक्षा बराच कमी प्रतिसाद मिळाला आहे. ही बाब केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांच्या ताज्या उत्तरातून स्पष्ट झाली. गरीब कल्याण योजनेत फक्त ५ हजार कोटींचे काळ्या पैशातले उत्पन्न जाहीर झाले आहे. उत्पन्नावरील कर व दंडाची रक्कम अधिक असल्याने बहुतांश लोकांनी सदर योजनेची घोषणा होण्याअगोदरच रोख रक्कम बँकांमधे जमा केल्यामुळे असे घडले असावे, असे सरकारला वाटते. नोटाबंदीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी जून ते सप्टेंबर २0१६ या कालखंडात काळ्या पैशांवर कर व दंड भरून तो मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘इन्कम डिस्क्लोजर योजना’ राबवण्यात आली. त्यात एकूण ६७ हजार ३८२ कोटी रुपये जाहीर झाले. आता सरकारने बेनामी व्यवहारांच्या विरोधात मोहीम चालवली आहे, असे अढिया यांनी स्पष्ट केले.