नवी दिल्ली- अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यानं भीमा-कोरेगावमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. यासाठी जिग्नेशनं मोदींनी गौरक्षकांकडून होणा-या दलितांवरील हल्ल्यासंदर्भात केलेल्या विधानाचा हवाला दिला आहे. तुम्हाला शूट करायचं असल्यास आधी मला शूट करा. परंतु माझ्या दलित मित्रांसोबत असा अन्याय करू नका.मोदींच्या या विधानाला पकडून जिग्नेश मेवाणी यानं मोदींवर निशाणा साधला आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यानं ट्विटरच्या माध्यमातून मोदींना लक्ष्य केलं आहे. नॉस्ट्राडेमस भविष्यवाणी करून गेले आहेत की, 21व्या शतकात जगातील सर्वोकृष्ट अभिनेता भारतातून येईल, अशा आशयाचं ट्विट करत मेवाणींनी मोदींवर टीका केली आहे. भीमा-कोरेगाव युद्धाच्या 200व्या वर्षानिमित्त कार्यक्रमात जिग्नेश मेवाणी उपस्थित होते. याच कार्यक्रमानंतर दलितांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर या हिंसाचाराचे लोण मुंबईपर्यंत पोहोचले. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
21व्या शतकातला सर्वोत्कृष्ट अभिनेता भारतातून येईल, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीला जिग्नेशने जोडले मोदींशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 5:33 PM