नवी दिल्ली: येत्या 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. देशभरातून 10 मुली आणि 12 मुले अशा एकूण 22 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील दोन बालकांचा समावेश आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती. आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचविले होते.
22 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीला आग लागली होती. त्यावेळी सहावीत शिकणाऱ्या झेन सदावर्ते हिने जागरुकपणे आगीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवले होते. शाळेत शिकलेल्या धड्यातील माहितीचा वापर तिने या प्रसंगातून सुटका होण्यासाठी केला होता.
औरंगाबादमध्ये राहणाऱ्या आकाश खिल्लारेने एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला. आकाश शाळेत जात असताना त्याला बुडणाऱ्या माय लेकी दिसल्या. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या दोघींना वाचवलं. नदीवर कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगी गेल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह
'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले
तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा
Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप