ऑनलाइन लोकमत
उत्तरकाशी, दि. 23 - उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील उत्तरकाशीमधील गंगोत्री धामचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या बसचा दरीत कोसळून अपघात झाला. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यापैकी 20 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर, आठ जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकजण मध्यप्रदेशातील इंदूर येथील रहिवाशी होते.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृत्यूमुखी लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आणि जखमीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
Bus is presently hanging on rocks, rescue operations underway pic.twitter.com/C8l0CspPe4— ANI (@ANI_news) May 23, 2017
#WATCH: Rescue ops by ITBP personnel near Uttarakhand"s Dharasu, where bus carrying 29 pilgrims from MP, fell into river;22 bodies recovered pic.twitter.com/I54Ucd6op3— ANI (@ANI_news) May 23, 2017