ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 5 - उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालेल्या भीषण अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीहून गोंडा येथे चाललेल्या बसचा भीषण अपघात झाला. बरेलीमध्ये एका ट्रकसोबत झालेल्या धडकेनंतर बसमधील टँकर फुटला आणि आग लागली. आगीमुळे बसमधून प्रवास करणा-या एकूण 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 15 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. बस प्रवाशांना घेऊन दिल्लीहून गोंडा येथे चालली होती. बरेलीत जेव्हा बसचा अपघात झाला तेव्हा बसमधील अनेक प्रवासी झोपलेले होते. बसला ट्रकची धडक बसताच डिझेल टँकर फाटला आणि दोन्ही गाड्यांना आग लागली. झालेला अपघात इतका अनपेक्षित होता की प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठीही वेळ मिळाला नाही.
17 dead in a collision between truck and a bus in Uttar Pradesh's Bareilly; both the vehicles caught fire on collision pic.twitter.com/5KgpW8lMAQ— ANI UP (@ANINewsUP) June 5, 2017
या अपघातामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश राज्य परिवहन विभागातील त्रुटी समोर आल्या आहेत. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर बसची मागची खिडकी खोलताच आला नाही. त्यामुळे लोकांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याची संधीच मिळाली आहे. मागची खिडकी जर खोलता आली असती तर अनेकांचा जीव वाचला असता.