222 कर्मचार्यांची तपासणी
By admin | Published: March 13, 2016 12:04 AM
जळगाव: जिल्हा पोलीस दल व गणपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयात शनिवारी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २२२ कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली.विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
जळगाव: जिल्हा पोलीस दल व गणपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयात शनिवारी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २२२ कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली.विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपअधीक्षक महारु पाटील (गृह), डॉ.शितल ओसवाल यांच्यासह शहरातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते. शिबिरात ४० वर्षावरील कर्मचार्यांची लिपीड प्रोफाईल, शुगर, हार्ट व ईसीजी अशा चाचण्या करण्यात आल्या. मानव संसाधन विभागाचे निरीक्षक वसंत मोरे व कर्मचार्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.