शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

२,२४0 कोटींची बँकांची फसवणूक

By admin | Published: April 13, 2017 1:07 AM

पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहास तब्बल २,२४0 कोटी रुपयांना फसविणाऱ्या सूर्या इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या चार संचालकांना सीबीआयने

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहास तब्बल २,२४0 कोटी रुपयांना फसविणाऱ्या सूर्या इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या चार संचालकांना सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना १0 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे.दिल्लीचे महानगर दंडाधिकारी सुमित दास यांनी आरोपींना २२ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. आरोपींमध्ये संजय जैन, राजीव जैन, रोहित चौधरी, संजीव अग्रवाल यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. या चौघांनी तब्बल १00 शेल कंपन्यांच्या माध्यमातून बँकांना चुना लावला आहे. या कंपन्यांचा वापर करून त्यांनी पैसा अन्यत्र वळविल्याची तक्रार पंजाब नॅशनल बँकेने केली आहे.चार आरोपींची सूर्या इंडस्ट्रीज ही कंपनी आणि अन्य शेल कंपन्या यांचा कोणताही वास्तविक व्यवसाय नाही. बँकांकडून कर्ज घेऊन नंतर त्यांनी हा निधी अन्य कंपन्यांकडे वळविला. या कर्जाची परतफेडही केली नाही. त्यातून बँकेला २,२४0 कोटी रुपयांचा फटका बसला.३०० कोटी वळविले- ३00 कोटी रुपयांचे खेळते भांडवलही आरोपींनी विदेशातील सहा कंपन्यांत वळविल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, शेल कंपन्या प्रत्यक्षात कुठलाही व्यवसाय करीत नाहीत. पैशाची हेराफेरी करणे, काळा पैसा पांढरा करणे यासाठी अशा कागदोपत्री कंपन्या उघडल्या जातात. त्यांच्या माध्यमातून कागदोपत्री व्यवहार दाखवून पैसा इकडून तिकडे वळविला जातो.