शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

पंजाबमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता, ट्रॅव्हल एजंटविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 11:29 AM

पंजाबमधील कपूरथळा येथील दोन शाळांमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता झाले आहेत. फेब्रुवारी 2016मध्ये या मुलांना काही ट्रॅव्हल एजंटसनी रग्बीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या पॅरिसला पाठवले होते.

ठळक मुद्दे25 मुलांना रग्बीच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठbल्यावर ते आठवडाभर रग्बीच्या कॅम्पमध्ये राहिले. नंतर त्यांची परतीची तिकिटे रद्द करण्यात आली.

नवी दिल्ली- पंजाबमधील कपूरथळा येथील दोन शाळांमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता झाले आहेत. फेब्रुवारी 2016मध्ये या मुलांना काही ट्रॅव्हल एजंटसनी रग्बीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या पॅरिसला पाठवले होते. सीबीआयने याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. फरिदाबादमधील ललित डेव्हिड डिन आणि दिल्लीमधील संजीव रॉय व वरुण चौधरी या ट्रॅव्हल एजंटसच्या कार्यालयाची तपासणी करुन तेथिल काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या मुलांना परदेशात पाठविण्यासाठी त्यांच्या पालकांकडून 25-30 लाख रुपये उकळले होते. या मुलांचा व्हीसा मिळवताना 15-18 वयोगटातील 25 मुले रग्बीच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला जात असल्याचे या एजंटांनी भासवले होते.सीबीआयचे प्रवक्ते CBI अभिषेक दयाळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, '' या सगळ्या 25 मुलांना रग्बीच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठbल्यावर ते आठवडाभर रग्बीच्या कॅम्पमध्ये राहिले. नंतर त्यांची परतीची तिकिटे रद्द करण्यात आली. मात्र सगळ्या व्यवहारात काहीतरी गडबड असल्याची शंका आल्यामुळे तिकिटे रद्द करण्यापुर्वीच दोन मुले भारतात आले होते.'' 

टॅग्स :IndiaभारतNew Delhiनवी दिल्ली