ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १९ - जम्मू काश्मीरमधील मेंढर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या 23 वर्षीय जवानाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अनिल बूरा असे या आत्महत्या करणा-या जवानाचे नाव आहे.
मेंढर सेक्टरमध्ये अनिल ड्युटीवर असताना त्याने बैरकमध्ये आत्महत्या केली असल्याचे समजते. त्याचा मृतदेह छताला लटकलेला दिसला. माध्यमांच्या वृत्तानुसार प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे उघड झाले आहे. मात्र, यावर अद्याप भारतीय लष्कराकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
23 year old Army Jawan, Anil Bura from Mendhar Sector J&K was found hanging in his living barracks today— ANI (@ANI_news) October 19, 2016