२३२ कामांचे चित्रीकरण मागविले जलयुक्त अभियान : जि.प.कडे त्रयस्थ संस्थेचा अहवाल अप्राप्त
By admin | Published: July 27, 2016 7:18 PM
जळगााव : जिल्हा परिषदेने मागील वर्षात २३२ गावांमध्ये केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामांचे चित्रीकरण मागविले आहे. कामे कशी केली आहेत याची तपासणी जि.प.ने आपल्या यंत्रणेकडूनही तपासून घेण्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे.
जळगााव : जिल्हा परिषदेने मागील वर्षात २३२ गावांमध्ये केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामांचे चित्रीकरण मागविले आहे. कामे कशी केली आहेत याची तपासणी जि.प.ने आपल्या यंत्रणेकडूनही तपासून घेण्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे. त्रयस्थ संस्थेने जि.प.कडून झालेली सर्व कामे तपासलेली नाहीत. परंतु बिले देण्यापूर्वीची खबरदारी, पुरावे म्हणून चित्रीकरण मागविले आहे. या चित्रीकरणाच्या आधारे बिले अदा केली जातील. तसेच कुठल्या कामात दोष असेल तर संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. त्याची कामाची २० टक्के रक्कम दोन महिने दिली जाणार नाही. सुधारणा झाल्यानंतर जि.प.ची यंत्रणा संबंधित कामाची तपासणी करील आणि काम व्यवस्थित झाले असेल तर बिल दिले जाईल, अशी माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेतली आहे. त्यात जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या सिमेंट नाला बांध दुरुस्ती व निर्मिती, कोल्हापूर बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव निर्मिती व दुरुस्ती आदी कामांची तपासणी झाली आहे. त्यात ५६ कामांमध्ये त्रुटी आढळली आहे. या त्रुटीसंबंधी तपासणी करणार्या त्रयस्थ संस्थेने अद्याप आपला अधिकृत अहवाल जिल्हा परिषदेला सादर केलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती जाहीर केली जाणार असून, संबंधित ठेकेदारांकडून कामांची दुरुस्ती प्रथम केली जाईल. परंतु ८० टक्के बिले सर्वांना सरसकट दिली जातील. २० टक्के बिले दोन महिन्यानंतर दिली जातील. जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत झालेल्या कामांचे चित्रीकरण मागविले आहे. तसेच जि.प.च्या अभियंत्यांकडूनही संबंधित कामांची तपासणी करून घेतली जाईल. त्रयस्थ संस्थेला इतर कामांची तपासणी करण्यासंबंधी पत्र दिले जाईल. या संस्थेने जि.प.च्या सर्व कामांची तपासणी अजून केलेली नाही. ज्या कामांची तपासणी केली त्याबाबतचा अधिकृत अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. -संजय मस्कर, अतिरिक्त सीईओ