शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 4:49 PM

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थ्यांना 700+ गुण

NEET UG Result 2024 : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने केंद्र आणि शहरांनुसार NEET UG च्या गुणांची यादी ऑनलाइन जारी केली आहेत. यंदा NEET परीक्षेत मोठा बदल झाला आहे. यापूर्वी फक्त मोठ्या कोचिंग हबमधील विद्यार्थी टॉप करायचे, पण या वर्षी देशभरातल्या 1404 केंद्रांमधून (276 शहरे आणि 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये) एकूण 2321 विद्यार्थ्यांनी 700+ गुण मिळवले आहेत. या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, आता छोट्या शहरांतील विद्यार्थीही मेहनत घेऊन मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत आहेत.

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी केले टॉपहे खरंय की, कोटा, सीकर आणि कोट्टायम सारख्या प्रसिद्ध कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, परंतु इतर सेंटरमधील विद्यार्थीदेखील चमकले आहेत. यंदा लखनौमधील (35), कोलकाता (27), लातूर (25), नागपूर (20), फरीदाबाद (19), नांदेड (18), इंदूर (17), कटक आणि कानपूर (16-16), कोल्हापूर, नोएडा, साहिबजादा अजितसिंग नगर (14-14), आग्रा आणि अलीगढ (13-13), अकोला आणि पटियाला (10-10), दावणगेरे (8) आणि बनासकांठा (7) या शहरांमधील विद्यार्थ्यांनी 700 हून अधिक गुण मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 

700 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थीही छोट्या शहरातील विशेष म्हणजे, 700 पेक्षा कमी, पण चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही छोट्या शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 509 शहरे आणि 4044 केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी 650 ते 699 गुण, 540 शहरे आणि 4484 केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी 600 ते 649 गुण, तर 548 शहरांमधील विद्यार्थ्यांनी 550 ते 599 दरम्यान गुण मिळवले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, यातील बहुतांश विद्यार्थी लहान शहरांमधील आहेत. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकालगेल्या वर्षीच्या (NEET 2023) तुलनेत या वर्षीच आकडे बरेच चांगले आहेत. NEET 2024 च्या तुलनेत NEET 2023 चा निकाल काहीसा कमी होता. NEET 2023 मध्ये, 700 ते 720 दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार 116 शहरे आणि 310 केंद्रांमधील होते. तर, 650 ते 699 दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार 381 शहरे आणि 2431 केंद्रातील होते. या बदलामुळे आता केवळ मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशातील हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाlaturलातूरnagpurनागपूरNandedनांदेडAkolaअकोलाAIIMS hospitalएम्स रुग्णालय