शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

२३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हजारो फुटांवर १५ मिनिटे धक्क्यावर धक्के; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:12 AM

एक प्रवासी जागेवरून उडाला : वैमानिकाची कमाल, दिल्लीत केले सुरक्षित लँडिंग

नवी दिल्ली : २३६ प्रवाशांना घेऊन जाणाºया विमानाला हजारो फुटांवर १५ मिनिटे धक्क्यावर धक्के बसत होते. याच काळात एक प्रवासी आपल्या जागेवरून उडाला. विमानाचा आॅटो पायलट मोडही अचानक बंद झाला, पण वैमानिकाने कसब दाखवत अखेर हवामानाच्या तडाख्यातून सर्वांची सुटका केली. अमृतसर येथून दिल्लीला जाणाºया एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ ड्रीमलाइनर विमानात ही घटना घडली.विमानाने अमृतसह येथून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान ८ हजार फुटांवरून २१ हजार फुटांवर जात होते. त्याच वेळी खराब हवामानाच फटका विमानाला बसला. विमानाच्या एका खिडकीचे आतील पॅनेल निखळले व काही ओव्हरहेड आॅक्सिजन मास्कही बाहेर आले. तब्बल १५ मिनिटे हा थरार सुरू होता. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडत होते. काहींनी देवाच्या धावाही सुरू केल्या होत्या. आता आपले काही खरे नाही, असेही काहींच्या मनात आले. विमान हेलकावे खात होते. त्यामुळे सीट बेल्ट न लावलेला एक प्रवासी आसनावरून उंच उडाला व त्याचे डोके केबिनला आदळले. तो जखमी झाला. आणखी दोन प्रवासीही किरकोळ जखमीझाले. सुदैव इतकेच या खिडकीच्या बाह्यभागाचे काहीही नुकसानझाले नाही.सव्वा तासाच्या या प्रवासानंतर अखेर हे विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरले. त्यानंतर, जखमी प्रवाशांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणाची एअर इंडिया व हवाई वाहतूक खात्याने चौकशी सुरू केली आहे.सिंगापूरच्या विमानालाही बसला होता तडाखाएअर इंडियाच्या विमानाला जसा खराब हवामानाचा फटका बसला, तशाच परिस्थितीचा सामना २०१४ साली आॅक्टोबर महिन्यात सिंगापूर एअरलाइन्सच्या एअरबस ए-३८० विमानाला करावा लागला होता. हे विमान मुंबईला चालले होते. त्या वेळी विमानातील आठ प्रवासी व १४ विमान कर्मचारी यांच्यासह २२ जण जखमी झाले होते. हे विमान मुंबईत उतरताच या सर्व जखमींवर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात