यंदाचे बजेट २४ कोटींचा जि.प.कडे १४ तालुक्यांची मागणी प्राप्त : हिंदकेसरी विजय चौधरीला मदतीसाठी तरतुदीची शक्यता
By admin | Published: February 14, 2016 12:42 AM
जळगाव- जिल्हा परिषदेचे २०१६-१७ चे बजेट (स्वनिधी) अंदाजे २४ कोटी रुपये असणार आहे. बजेटबाबत कार्यवाही सुरू झाली असून, रावेर वगळता इतर १४ तालुक्यांच्या वित्तीय मागण्या प्राप्त झाल्या आहेत.
जळगाव- जिल्हा परिषदेचे २०१६-१७ चे बजेट (स्वनिधी) अंदाजे २४ कोटी रुपये असणार आहे. बजेटबाबत कार्यवाही सुरू झाली असून, रावेर वगळता इतर १४ तालुक्यांच्या वित्तीय मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचे बजेट सुमारे अडीच कोटींनी अधिक असेल. मागचे बजेट २१ कोटी ६७ लाख रुपयांचे होते. या बजेटमधून चाळीसगावमधील हिंदकेसरी विजय चौधरी याला ५० हजार रुपये रक्कम मदत, गौरव म्हणून जि.प.कडून दिली जाण्याची शक्यता आहे. जि.प.तील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर ही तरतूद होईल, अशी माहिती आहे. भांडवली उत्पन्नाची माहिती तयारजि.प.चे बजेट भांडवली व महसुली उत्पन्नाच्या आधारे तयार केले जाते. भांडवली उत्पन्न निविदा शुल्क, मालमत्तेतून मिळोला पैसा, गुंतवणुकीवरील व्याज, अभिकरण शुल्क या माध्यमातून मिळते. त्याची माहिती तयार झाली आहे. परंतु महसूल उत्पन्नासंबंधीचे अनुदान जि.प.ला अजून प्राप्त झालेले नाही. वाढीव उपकर, पाणीपी उपकर, मुद्र्रांक शुल्क अनुदान, जमीन समानीकरण या माध्यमातून महसुली उत्पन्न मिळते. मुद्रांक शुल्कात मोठी तूरमागील बजेट सादर करताना तीन कोटी ६४ लाख रुपये मुद्रांक शुल्क मिळेल, अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती. परंतु आतापर्यंत फक्त ६२ लाख रुपये मुद्रांक शुल्क मिळाले आहे. महसुली उत्पन्नातील ५३ टक्के पैसा चार विभागांसाठीमहसुली उत्पन्नातून मिळणार्या ५३ टक्के निधी, पैशांमधून समाज कल्याण विभागासाठी २० टक्के, बाल कल्याण योजनांवर १० टक्के, पाणीपुरवठा विभागासाठी २० टक्के आणि अपंग कार्यक्रमावर तीन टक्के निधी खर्च केला जाईल. २७ मार्च पूर्वी विशेष सभाजि.प.ला २७ मार्चपूर्वी बजेट मंजूर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी २० ते २५ मार्च यादरम्यान विशेष सभेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. या वृत्तास मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांनी दुजोरा दिला. कोट-महसुली उत्पन्न प्राप्त झाल्यानंतर बजेटला अंतिम स्वरुप देण्यास गती येईल. भांडवली उत्पन्नाची माहिती तयार आहे. तसेच १४ तालुक्यांमधून बजेटसंबंधीची माहिती प्राप्त झाली आहे. यंदाचे बजेट मार्गील आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक असू शकते. -राजू सोळुंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.