शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

मथुरा हिंसाचारात २४ ठार; शस्त्रे जप्त

By admin | Published: June 04, 2016 3:46 AM

अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ झाली आहे. मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदाराचाही समावेश आहे

मथुरा : अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ झाली आहे. मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदाराचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला असून, ३२०पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. तसेच दोन मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. जखमी २३ पोलिसांना रुग्णालयात दाखल केले आहे. जवाहरबाग परिसरात सुमारे ३ हजार लोकांनी २६० एकरापेक्षा जास्त भूखंडावर दोन वर्षांपासून अवैध कब्जा केला होता. केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा अहवाल मागितला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यादव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. चूक झाल्याची कबुलीअतिक्रमणकर्ते आणि पोलिसांतील हिंसक संघर्ष ही प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेची चूक असल्याची कबुली अखिलेश यादव यांनी दिली. पोलिसांना हल्लेखोरांच्या तयारीबाबत माहिती नव्हती, असे सांगून ते म्हणाले की, पोलिसांनी संपूर्ण तयारीनिशी आणि सविस्तर माहिती मिळवून तेथे जायला पाहिजे होते. आंदोलनकर्त्यांजवळ एवढे काही असेल याची त्यांना कल्पना नव्हती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक अतिक्रमणकर्त्यांना हटविण्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी तेथे पोहोचले असता, अवैध कब्जा करणाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणेदार संतोष यादव यांचा मृत्यू झाला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या आणि लाठीमार केला. पण आंदोलनकर्त्यांनी तेथे ठेवलेले गॅस सिलिंडर आणि दारूगोळ्याला आग लावली. त्यामुळे स्फोट झाले. या हिंसाचारात २२ दंगलखोर ठार झाले असून, यापैकी ११ जण आगीत मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये एक महिलाही आहे. घटनास्थळावरून ४७ पिस्तुले, ६ रायफल्स आणि १७८ काडतुसे ताब्यात घेण्यात आली.