हैदराबाद : तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, तेथील शेतकºयांना नववर्षाची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.या राज्यात गेल्या १० वर्षांत अनेक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने मोठाच दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या २३ लाख कृषिपंपांना बारमाही अखंड वीजपुरवठा करण्यात येईल. सर्व क्षेत्रांतील ग्राहकांना अहोरात्र अखंडित वीजपुरवठा करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.येत्या मार्चपर्यंत राज्यातील विजेची मागणी ११ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असे सरकारच्या वीजपुरवठा कंपनीने म्हटले आहे. कालेश्वरमसहित काही जलसंधारण योजना जून महिन्यापासून अंमलात येणार असून, त्यामुळे विजेची मागणी व पुरवठा यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.पुरेशा प्रमाणात वीज उपलब्धकरून देऊ, हे शेतकºयांना दिलेलेआश्वासन पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी शेजारच्या राज्यांकडूनही आम्ही वीज खरेदी करू, असे मुख्यमंत्री राव यांनी सांगितले. राज्याच्या ऊर्जा विभागाने सध्याची वीजपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी १२,६१० कोटी रुपये आजवर खर्च केले आहेत. (वृत्तसंस्था)अनेक राज्ये शेतकºयांना अखंड व बारमाहीवीज देत असले, तरी ती मोफत नाही.सरकारने २०१४ मध्ये शेतकºयांना सलग ९ तास आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांना अखंडित वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतलाजुलै २०१७ मध्ये मेडक, नालगोंडा, करीमनगरयेथील शेतकºयांना प्रायोगिक तत्त्वावर अहोरात्र वीजपुरवठा सुरू केला.नोव्हेंबर २०१७ मध्ये राज्यातील २३ लाख कृषिपंपांना प्रायोगिक तत्त्वावर अहोरात्र वीजपुरवठा सुरू झाला.तेलंगणा राज्य जेव्हा स्थापन झाले, तेव्हा तेथील वीजनिर्मितीची क्षमता ६,७५४ मेगावॅट होती. त्या वेळी वीज खंडित होण्याचे प्रमाणही अधिक होते. मात्र, त्यानंतर वीजनिर्मितीची क्षमता वाढून, ती ८,२७१ मेगावॅट झाली. नजीकच्या काळात ती १३ हजार मेगावॅटपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
२४ तास मोफत वीज : तेलंगण सरकारवर शेतकरीराजा झाला खूश ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:59 AM