शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

चेंगराचेंगरीत २४ भाविक ठार

By admin | Published: October 16, 2016 4:39 AM

उत्तर प्रदेशच्या चंदोली आणि वाराणसी जिल्ह्याच्या सीमेवर बाबा जय गुरुदेव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन २४ जण मृत्युमुखी, तर ५0हून

चंदौली : उत्तर प्रदेशच्या चंदोली आणि वाराणसी जिल्ह्याच्या सीमेवर बाबा जय गुरुदेव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन २४ जण मृत्युमुखी, तर ५0हून अधिक लोक जखमी झाले. शनिवारी हा प्रकार घडला. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५0 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देतानाच, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी- चंदौली जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर डोमरी गावात बाबा जय गुरुदेव यांच्या जयंतीनिमित्त दोनदिवसीय जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने भाविक वाराणसीच्या पिली कोठी येथून डोमरीकडे जात होते. रस्त्यात राजघाट पुलावरून लोक जात असताना, अचानक चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी सांगितले की, कार्यक्रमाला दोन ते तीन हजार लोक येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते. पण त्याहून अधिक लोक आले. त्यामुळे पुलावर गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. आयोजकांनी येणाऱ्या लोकांची काहीच व्यवस्था न केल्यामुळे हा प्रकार घडला.- आयोजकांनी म्हटले आहे की, आलेले लोक पुलावरून पुढे सरकत असताना, पोलिसांनी त्यांना मागे ढकलण्यास सुरुवात केली. त्यातून गोंधळ उडाला. मागे असलेल्या लोकांमध्ये पूल कोसळल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.- जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे.