शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

जेईई-मेन परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; १३ भाषांमध्ये झाली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 6:59 AM

जेईई मेन्समध्ये अमरावती येथील श्रेणिक मोहन साकला २९५ गुण मिळवत राज्यातून अव्वल तर देशात ११ व्या स्थानी झळकला आहे.

नवी दिल्ली : इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई-मेन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळविले. ही माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे. या परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या पाच विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. या यशवंतांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रत्येकी ५, राजस्थानातील ४, उत्तर प्रदेशमधील २, हरयाणा, आसाम, बिहार, पंजाब, केरळ, कर्नाटक, झारखंड या राज्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. 

अंबाडीच्या भाजीवर संशोधन करणारा अमरावतीचा श्रेणिक राज्यात अव्वल

जेईई मेन्समध्ये अमरावती येथील श्रेणिक मोहन साकला २९५ गुण मिळवत राज्यातून अव्वल तर देशात ११ व्या स्थानी झळकला आहे. आयआयटी, पवई येथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचा मानस त्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला. विदर्भाच्या मातीत अलगदपणे उगवणारी अंबाडीची भाजी ही कशी गुणकारी आहे, हे श्रेणिकने संंशोधन प्रकल्पातून सिद्ध केले आहे. याच प्रकल्पाला डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राने सुवर्ण पदकाने गौरविले होते.

देश-विदेशातील ६२२ केंद्रांवर परीक्षा

जेईई-मेन परीक्षा ४४० शहरांतील ६२२ परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये विदेशातील मनामा, दोहा, मस्कत, शारजाह, रियाध, काठमांडू, दुबई, सिंगापूर, कुवेत, कौलालंपूर, लागोस/अबुज, कोलंबो, जकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुईस, बँकॉक या ठिकाणांचा समावेश होता. त्यातील व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुईस, बँकॉक येथे पहिल्यांदाच जेईई-मेन परीक्षा घेण्यात आली.

टॅग्स :examपरीक्षाIndiaभारतStudentविद्यार्थी