नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासांत कोरोनाचे सर्वाधिक प्रकरण समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत देशात गेल्या 12 तासांत 240 नवे रुग्ण समोर आले आहेत. यानुसार आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 1637 वर पोहोचली आहे.
या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे.
भारत सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी कसोशीने प्रययत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण -महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण 302 रुग्ण आढळून आले आहेत यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रा खालोखाल केरळमध्ये 241 रुग्म आढळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्णाटकातही 101 तम कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. असे देशातील एकूण 26 राज्य आणि अंदमान निकोबारमध्ये कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता -कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे सुमारे 120 अब्ज डॉलर (9 लाख कोटी रुपयांचे) नुकसान होण्याची शक्यता आहे, असा अंदाज एका वृत्तामधून वर्तवण्यात आला आहे. हे नुकसान देशाच्या एकूण जीडीपीच्या 4 टक्के आहे.