कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १,९६१ उमेदवारांपैकी २४४ कोट्यधीश असून, त्यात तृणमूल काँग्रेसचे ११४ जण आहेत. भाजपा ४६ कोट्यधीश उमेदवारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसचे ३१, अपक्ष १९, माकपा १३, बसपा ४, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक प्रत्येकी दोन, इतर राजकीय पक्षांचे ११ उमेदवार कोट्यधीश असून राजदचाही एक उमेदवार कोट्यधीश आहे. मावळत्या २४५ आमदारांपैकी पुन्हा रिंगणात असलेले ८१ उमेदवार कोट्यधीश आहेत. आमदारांच्या संपत्तीतील वाढ जवळपास ११२ टक्के आहे. राज्यातील २४५ आमदारांची सरासरी मालमत्ता २०११ मध्ये ६०.११ लाख होती. ती २०१६ मध्ये वाढून १.२७ कोटी रुपये झाली.
२४४ उमेदवार कोट्यधीश
By admin | Published: May 04, 2016 2:05 AM