नितीन अग्रवाल, लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील काेराेना प्रतिबंधक लसीकरण माेहिमेचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. एका दिवसात दोन कोटी २२ लाख डाेस देण्यात आले आहेत. सर्वाधिक डाेस भाजपशासित राज्यांमध्ये टाेचण्यात आले. तर यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक १ काेटी ४१ लाख डाेस देण्यात आले हाेते.
पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी माेठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रांवर विशेष माेहीम राबविण्यात आली. दुपारी दीडपर्यंत वाजताच्या सुमारास १ काेटी डाेस देण्यात आले हाेते. त्यामुळे दिवसअखेरपर्यंत दाेन काेटींचा आकडा सहजपणे पार हाेईल, हे स्पष्ट झाले हाेते.
सायंकाळी ५ वाजता दाेन काेटी डाेसचा टप्पा पार केला. लसीकरणाचा नवा विक्रम रचून पंतप्रधान माेदींना वाढदिवसाची भेट देऊ, असे केंद्रीय आराेग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले हाेते.
लसीचा बूस्टर डोस नाही
जगभरात कोरोनाच्या दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोसची तयारी सुरू असली तरी भारतात मात्र तसा विचार सुरू नाही. आता प्रत्येक भारतीयाला कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्र देण्यावरच लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
तीन दिवसांत ४ काेटी डाेस
पहिले १० काेटी डाेस ८५ दिवसांत, ६५ काेटी ते ७५ काेटींचा टप्पा केवळ १३ दिवसांत, तर ७५ ते ७९ काेटी हा टप्पा केवळ ३ दिवसांमध्येच गाठण्यात आला.
११,७१,००० राजस्थान, ११,६५,००० महाराष्ट्र, २५,४२,००० कर्नाटक, २२,३०,००० मध्य प्रदेश, २५,०८,००० बिहार, २३,३०,००० उत्तर प्रदेश,
१,०८,९९,६९९ २७ ऑगस्ट, १,४१,२०,४६७ ३१ ऑगस्ट, १,१९,९०,८३९ ६ सप्टेंबर, २,२५,००,००० १७ सप्टेंबर.