ऑनलाइन लोकमत
नवादा, दि. 31 - पोपट हरवला म्हणून त्याला शोधणा-याला 25 हजार बक्षीस देण्याची घोषणा केल्याचं कधी तुम्ही ऐकलंय का?बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे. नवादा जिल्ह्यातील बबिता देवी या महिलेचा पोपट हरवला आणि त्यांनी चक्क पोपटाला शोधणा-यास 25 हजार रूपये देण्याची घोषणा केली. इतकंच काय तर 3 जानेवारीपासून त्यांनी खाणं-पिणंही सोडलं असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.
बबिता देवी यांनी पोपट हरवल्याचं पत्रक काढून ते वाटलं आणि पोपटाला शोधणा-यास 25 हजार रूपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही केली.
पोपटावर त्यांचं अतिशय प्रेम होतं , गेल्या 8 वर्षांपासून घरातील सदस्यांप्रमाणेच हा पोपट बबिता देवींसोबत होता. सकाळी सर्वांना उठवण्याचं काम तो करायचा. शिवाय तो पिंज-यातही राहात नव्हता.