नवी दिल्ली : सामान्यत: म्हशीचे दूध विकून पैसे कमावले जातात. पण असेही एक काम आहे की म्हशींना चारा खाऊ घालण्याचे दरमहा २५ हजार रुपये वेतन देते. ही वस्तुस्थिती आहे नोएडामधील. येथे म्हशींना चारा खाऊ घालायला थेट कर्मचारीच नेमण्यात आले असून त्यांना महिन्याला २५ हजार रुपये वेतन दिले जाते. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेजवळ झट्टा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या म्हशींना चारा घालण्यासाठी काही लोकांना नोकरीवर ठेवले आहे. ते निरक्षर असले तरी त्यांचे वेतन २५ हजार रुपये आहे. यातील बहुतेक लोक बिहारी व उत्तर प्रदेशातील आहेत. या म्हशींच्या मालकांकडे म्हशींना चारा खाऊ घालायला वेळ नाही. येथील बहुतांश शेतकऱ्यांकडे म्हशी आहेत व त्यामुळे म्हशींना चारा खाऊ घालायला मोठ्या संख्येने कर्मचारी लागतात. बादोली, गुलावली, कोंडली, कामनगरसह इतर गावांतही असाच उपाय केला गेला आहे. अनंगपाल नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की,‘‘म्हैस सरासरी रोज ८ ते १० लिटर दूध देते. महिन्याला एक म्हैस १५ हजार रुपयांचे उत्पन्न देते. त्यामुळे जर कोणी ५०० रुपये घेऊन म्हशींना चारा देत असेल तर त्यात शेतकऱ्यांचा फायदाच आहे.’’
म्हशी न पाळताही मिळवितात दरमहा २५ हजार रुपये
By admin | Published: June 15, 2017 12:51 AM