शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

जूनच्या 25 किंवा 26 तारखेला मोदी ट्रम्पना भेटणार

By admin | Published: June 12, 2017 11:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौ-यात 25 किंवा 26 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौ-यात 25 किंवा 26 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-याच्या तारखा आज जाहीर होऊ शकतात. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. आतापर्यंत तीन वेळा दोन्ही नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. 
 
दहशतवादाच्या मुद्यावर ट्रम्प यांनी भारताला अनुकूल भूमिका घेतली असली तरी, पॅरिस हवामान करारातून माघार घेताना त्यांनी भारतावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे मोदी यांच्या अमेरिका दौ-याबद्दल सांशकता निर्माण झाली होती. पण सरकारने मोदी अमेरिका दौ-यावर जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. पॅरिस हवामान करारातून भारत आणि चीनला अब्जाववधी डॉलर्स मिळणार आहेत असे भारताला दुखावणारे विधान त्यांनी केले होते. 
 
अमेरिकेने अशी तडकाफडकी माघार घेतल्यानंतरही मोदींनी पॅरिस हवामान करारातील नियम आणि अटींचे पालन करणार असल्याचे म्हटले होते. मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. दहशतवाद, अफगाणिस्तान यासह एच-1 बी व्हिसा, व्यापार आणि संरक्षण भागीदारी या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसा नियम कठोर केल्याने भारतीय आयटी उद्योगाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. या जाचक नियमांमधून कसा मार्ग काढता येईल यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. 
 
संरक्षण क्षेत्रात भागीदारी वाढवताना भारत-अमेरिका संयुक्त उत्पादन कार्यक्रम हा सुद्धा मोदी यांच्या दौ-यात महत्वाचा मुद्दा असेल. युद्ध वाहने, हॅलिकॉप्टर, टेहळणी उपकरणे संयुक्तपणे विकसित करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. यासंबंधी करार होऊ शकतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर 2014 ते 2016 दरम्यान मोदींच्या आठ बैठका झाल्या. मोदी तीनवेळा अमेरिका दौ-यावर गेले. ओबामा 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत.