हरिश गुप्तानवी दिल्ली :
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दि. ३० जानेवारी रोजी समारोप होत असून, हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमात नितीशकुमार (बिहार), एम. के. स्टालिन (तामिळनाडू), हेमंत सोरेन (झारखंड) आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल व सुखविंदर सिंह सुक्खू उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे व्यक्तिश: तेथे जाण्याची शक्यता नसून, संजय राऊत (शिवसेना) जाणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व सुप्रिया सुळे करण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माकपचे जम्मू-काश्मीर प्रमुख मोहम्मद युसूफ तारिगामी हे पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकतात. भाकपने निमंत्रण स्वीकारले आहे. काँग्रेसने या कार्यक्रमासाठी आप, बीआरएस, वायएसआर काँग्रेस, बिजद, एआययूडीएफ आणि अकाली दलाला निमंत्रण दिलेले नाही.
सोनिया गांधींकडून विनंती३० जानेवारीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी काही विरोधी पक्षनेत्यांना वैयक्तिकरीत्या विनंती करीत असल्याचे समजते.