नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत. ही योजना गेल्या महिन्यात संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ७५ हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार दोन हेक्टर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना एका वर्षांत सहा हजार रुपये तीन हप्त्यांत विभागून दिले जातील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने अर्थसंकल्पात २० हजार कोटी रुपये या योजनेत मार्च २०१९ अखेर प्रत्येक शेतकºयाला दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी राखून ठेवले होते.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला राष्ट्रीय पातळीवर औपचारिक प्रारंभ गेल्या २४ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्या दिवशी १.०१ कोटी शेतकºयांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला.‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २.६ कोटी छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या बँक खात्यात एकूण ५ हजार २१५ कोटी रूपये योजना जाहीर झाल्यापासून ३७ दिवसांत थेट जमा केले गेले, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी टिष्ट्वटरद्वारे सांगितले. अगदी छोट्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थींना अशी रक्कम दिली गेली अशी ही पहिलीच योजना असेल, असेही पीएमओने म्हटले.गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले होते की उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्याने प्रधान मंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. सात मार्चपर्यंत उत्तर प्रदेशातील ७४.७१ लाख शेतकºयांना पहिला हप्ता मिळाला तर आंध्र प्रदेशातील ३२.१५ लाख शेतकरी याच योजनेचे लाभार्थी ठरले.कोणत्या राज्यात किती आहेत लाभार्थी?गुजरातमधील २५.५८ लाख, ११.५५ लाख शेतकरी महाराष्ट्रातील, तेलंगणातील १४.४१ लाख शेतकरी आणि तमिळनाडूतील १४.०१ लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरले. इतर राज्यांतील लाभार्थी शेतकºयांची संख्या अशी : हरियाना (८.३४ लाख), आसाम (८.०९ लाख) आणि ओडिशा (८.०७ लाख). केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी पात्र ठरवलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांत केंद्र सरकार थेट हे पैसे जमा करीत आहे.
२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:18 AM