शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

धक्कादायक! कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासांत डॉक्टरचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 1:21 PM

delhi doctor : २६ वर्षीय डॉ. अनस मुजाहिद यांच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देडॉ. अनस मुजाहिद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली होती.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातच दिल्लीतील गुरू तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालयातील डॉ. अनस मुजाहिद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना झाल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनानंतर झालेल्या लक्षणांमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.  २६ वर्षीय डॉ. अनस मुजाहिद यांच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. (26 year old delhi doctor dies of covid complications within hours of testing positive)

डॉ. अनस मुजाहिद यांची ड्युटी कोव्हिड सेंटर म्हणून घोषित केलेल्या जीटीबी रुग्णालयात होती. डॉ. अनस मुजाहिद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली होती. नॉर्श-ईस्ट दिल्लीतील भागिरथी विहार येथे राहत असलेले डॉ. अनस मुजाहिद यांनी OB-Gyn वार्डमध्ये शनिवारी संध्याकाळपर्यंत आपली ड्युटी केली होती.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, डॉ. अनस मुजाहिद यांचा कोरोना रिपोर्ट शनिवारी रात्री आठ वाजता पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा रविवारी रात्री ३ वाजता मृत्यू झाला. डॉ. अनस मुजाहिद यांचे सहकारी डॉ. आमिर सोहेल यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी डॉ. अनस मुजाहिद हे इफ्तारसाठी आपल्या घरी गेले होते.

डॉ. आमिर सोहेल यांनी हिंदुस्तान टाइम्स दिलेल्या माहितीनुसार,  डॉ. अनस मुजाहिद यांना लीला हॉटेलमध्ये रुम मिळाली होती, इफ्तारनंतर हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी त्यांना ताप आल्यासारखे वाटले, यानंतर त्यांनी जीबीटी रुग्णालयात कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अचानक बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळले. त्यानंतर आम्ही त्यांना कॅज्युअलिटी वार्डमध्ये दाखल केले. तेव्हा ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यांचे सीटी स्कॅन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. तात्काळ न्यूरोलॉजिकल विभागात हलविले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला, असे डॉ. आमिर सोहिल यांनी सांगितले.

दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये ८० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह!दिल्लीत सरोज हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या हॉस्पिटलमधील जवळपास ८० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील या सरोज हॉस्पिटलमध्ये आता सर्व ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारटाईन करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. एके रावत यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना संकटात ही चिंताजनक बाब आहे की, इतके डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

(Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...)

दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीरराजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

(दिल्लीत लॉकडाऊन वाढविला; कडक निर्बंधासह आजपासून मेट्रो सेवाही बंद)

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर