२७... उमरेड
By admin | Published: December 27, 2014 11:38 PM
(फोटो)
(फोटो)आई घरातलं मांगल्य तर बाप दारावरील अस्तित्वसिंधूताई सपकाळ : उमरेड येथे व्याख्यानउमरेड : मुली आणि महिलांनी चांगले दिसण्यापेक्षा चांगल कस जगावं, हे लक्षात घेतल पाहिजे. आईने भावनेपेक्षा कर्तव्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मानवतेच्या रक्षणासाठी जिजाऊने शिवबाला घडविले. कारण आई घरातलं मांगल्य असून, बाप दारावरील अस्तित्व आहे, असे प्रतिपादन सिंधूताई सपकाळ यांनी केले. स्थानिक माधव बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी उमेश काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवानी दाणी, श्रीकृष्ण पाठे, संजय दाणी, अरुण गिरडकर, दिलीप राऊत, अश्विनी हजारे आदी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, आपण शिकण्याची आवड असूनही शिकू शकले नाही. पण वाचनाचे वेड सोडले नाही. आयुष्यात तीनदा आत्महत्या करण्याचा प्रसंग आला. परंतु मरण्याआधी जगायला शिकले. त्यातून समाजकार्यात उडी घेतली. दुसऱ्यांच्या मुलांची आई होणे शिकायला पाहिजे. मी हजारो मुलांची आई झाले. त्यामुळेच तीन राष्ट्राध्यक्षांनी माझा सत्कार केला. १४ देशात भाषणे झाली, असेही त्यांनी हसतखेळत सांगितले. माझ्यावर घडलेल्या सर्व प्रसंगामधील सहभाग्यांना मी कधीेच माफ केले. त्यामुळे तुम्हीही माफ करायला शिकायला पाहिजे. तुम्ही अनाथ मुलांना मदत करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सिंधूताईंच्या सुपूर्द करण्यात आली. संचालन लीना मेश्राम यांनी केले तर, आभार पुरुषोत्तम शेंदरे यांनी मानले. यशस्वितेसाठी ॲड. सारंग पिंपळकर, वसंता काळे, प्रदीप शेंडे, दिलीप चट्टे, अमित तोंडे, सुभाष पाठक, राजू कावळे, प्रवीण दाणी, गणेश मुंडले, शिल्पा कारगावकर, शैलेश ठोंबरे, शारदा राऊत, गणेश वाकडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)***